विशाल अशोक ढेरे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (ACST)  वर्ग एक यापदी निवड झाल्याबद्दल सत्कार

आज दिनांक 06/03/2023 रोजी वंचित बहुजन आघाडी करमाळा वतीने विट गावचे सुपुत्र विशाल अशोक ढेरे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त (ACST)  वर्ग एक यापदी निवड झाल्याबद्दल विट येथे समस्त नागरीक वंचित बहुजन आघाडी  करमाळा यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे सर, तालुका महा सचिव नंदू कांबळे सर, तालुका संघटक बाळासाहेब कांबळे व वंचित बहुजन आघाडीचे  कार्यकर्ते उपस्थित होते. तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे सरांनी आपल्या मनोगतातून त्याच्या आजी,  आई-वडिल, चुलते दिलीप काका व काकी यांचे आभार मानून विशाल ला त्याच्या पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा  दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *