
कोविड-19 अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन मिळावे
जेआरडी माझा
महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना डाँक्टर संघटनेने कोविड-19 अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन मिळावे याबाबतचे निवेदन दिले आहे.
म्हंटले आहे कि, करमाळा तालुक्यामध्ये आम्ही कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर येथे आम्ही खाली सही करणारे अधिकारी व कर्मचारी आहोत. आमचे माहे एप्रिल 21 ते जुलै 2021 चे मानधन अद्याप आम्हाला मिळालेला नाही. तसेच आम्ही आमच्या जीवाची कुटुंबाची परवा न करता अहोरात्र कर्तव्य पार पाडली परंतु आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कारण अद्याप पर्यंत 4 महिन्याचे मानधन आम्हाला मिळाले नाही.

माहे एप्रिल ते जुलै 2021 पर्यंत मानधन झालेले नाही जर आमचे 10 दिवसात मानधन अदा झाले नाही तर आम्ही आमरण उपोषण करू व होणाऱ्या परिस्थितीला आपले प्रशासन जबाबदार आहे तरी विनंती आहे आमचे तात्काळ मानधन अदा करावे.
तसेच कोविड 19 महामारीच्या काळात देशांवरील एवढ्या मोठ्या संकटांच्या वेळी आमचा फक्त वापर करून घेतला हे धोरण चुकीचे वाटते तरी आपण आमच्या कर्तव्याची दखल घेऊन आमचे मानधन लवकरात लवकर मिळावे याबाबतचे निवेदन

डॉ. संकेत गोपाळ सावंत, डॉ. गणेश ज्ञानदेव राऊत, डॉ. यशवंत रामहरी राऊत, डॉ. राहुल मारुती जाधव, बालाजी नवनाथ लेकुरवाळे, अनिरुद्ध बाळासाहेब शेलार, जयश्री बाळू खुडे, मेघा मोहन पवार, प्रियांका विठ्ठल कुंभार, सीता राजाराम गावीत, सपना केतन पाटील, विक्रम विलास तोडकरी, रवी राउत, प्रकाश प्रभू चांगण, सुजित रमेश जाधव, वैभव पाटील, निखिल दादासाहेब काळे.यांनी दिले आहे