कमलाभवानी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता
सहावा गळीत हंगाम 584445 हे. टन ऊसाचे गाळप.

प्रतिनिधी ——

आज.दिनांक ५ मार्च रोजी कमलाभवानी साखर कारखान्याचा सांगता समारंभ प्रमुख पाहुणे मा.श्री वामन(दादा) बदे यांच्या शुभहस्ते पूजन होऊन संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्रजी बारकुंड तात्या मामा सरडे, शहाजी बापू झिंजाडे, तात्या पाटील, समाधान भोगे , सतीश गाढवे ,समाधान जगताप, सौदागर सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, रोहन दळवी आदी उपस्थित होते. कारखान्याचे जनरल मॅनेजर रोकडे साहेब यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कारखान्याच्या प्रगतीची दिशा व स्वरूप मांडले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजेंद्र बारकुंड यांनी कारखान्याच्या गाळप हंगामावर समाधान व्यक्त करत तो यशस्वीरित्या पार केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले व शेतकऱ्यांच्या वतीने पेमेंट लवकर करण्याची मागणी केली.

साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री विक्रमसिंह (दादा )शिंदे यांनी ऊस पेमेंट लवकरात लवकर करण्याबद्दल आपण प्रयत्नशील असून साखर एक्सपोर्ट कोटा मागणीसाठी वारंवार प्रयत्नशील असल्याचे सांगितले त्याचबरोबर आपल्याकडे डिस्टलरी नसल्याने पेमेंटचे अडचण होत असल्याचे सांगितले त्याचबरोबर पुढील वर्षी आपण नवीन डिस्टलरी प्रोजेक्ट उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले यावर्षीचा गाळप हंगाम पूर्ण करण्यासाठी सर्व उत्पादक शेतकरी वाहतूकदार ऊस तोडणी कामगार या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले त्याचबरोबर मागील हंगामापेक्षा या हंगामात बऱ्याच त्रुटी आपण कमी

केल्या असून कारखाना सुस्थितीत चालविण्याबद्दल चीफ इंजिनिअर गायकवाड साहेब, चिफ केमिस्ट जाधव, डे. जनरल मॅनेजर क्षिरसागर साहेब यांचे त्यांनी मनापासून आभार मानले त्याचबरोबर शेती विभाग आणि सर्वच विभागाने आपली भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडले बाबत कारखान्यातील कर्मचारी कामगार यांचे त्यांनी मनापासून आभार मानले
गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी आपण सर्व कर्मचाऱ्यांना पंधरा दिवसाचा बोनस पगार म्हणून देणार असल्याची घोषणा त्यांनी आपल्या भाषणातून केली.
कार्यक्रमाच्या शेवटी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी रामहरी जगताप यांनी सर्व उत्पादक वाहतूकदार उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांच्या कर्मचारी कामगार या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे सांगितले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *