
जे.के.फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित शिबिरात १०२ जणांचे रक्तदान
वाशिंबे(सचिन भोईटे):- जे. के. फाऊंडेशन यांच्यावतीने वाढदिवस निमित्ताने वाशिंबे येथे जि.प. शाळा परिसरात अक्षय ब्लड बॅंक सोलापूर यांच्या सौजन्याने आयोजित रक्तदान शिबिर केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह.भ.प. माऊली महाराज झोळ व डॉ. सुदर्शन नवनाथ झोळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून केले. यावेळी नेते नवनाथ बापू झोळ, शरदचंद्रजी पवार विद्यालयाचे अध्यक्ष रामदास साळुंके, विविध कार्यकारी सोसायटी मा.चेअरमन

राजाभाऊ झोळ, शेतकरी संघटना उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ, जे. के. फाऊंडेशन अध्यक्ष अमोल भोईटे, डॉ. विक्रम नाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात मुख्यध्यापक रमेश यादव, सहशिक्षक हरी शिंदे, महेश कुलकर्णी सर यांच्यासह मोहित झोळ,विजय शिंदे, किशोर झोळ, अनिल लोखंडे, अजित झोळ, रोहीत बारहाते, गोविंद डोळे, रवी जगदाळे, किशोर गायकवाड, स्वप्निल झोळ, सचिन पवार, सुनिल झोळ, योगेश चव्हाण यांच्यासह या रक्तदान शिबिरात १०२ युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. जे. के. फाऊंडेशन यांनी ३ वर्षात आतापर्यंत वाशिंबे येथे रक्तदान शिबिर आयोजित करून ४८६ युनिट रक्त संकलन करून रक्तदानाचे गावातील युवक मित्र परिवार यांच्या सहकार्याने महान असे कार्य केले आहे.

