
स्नेहालय स्कूल मध्ये होळी उत्साहात साजरी
करमाळा प्रतिनिधी
सोमवार दि. ६ मार्च २०२३ रोजी स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये होळी हा सन उत्साहात साजरी करण्यात आला होता. मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांनी होळीचे पूजन करून श्रीफळ फोडला होता. यावेळी टिचर हेमा शिंदे व शिवांगी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना होळी विषयी माहिती सांगितली होती.
त्यावेळी सहशिक्षिका सीमा कोरडे, शिवांगी शिंदे, हेमा शिंदे, पल्लवी माळवे, फरहान खान, शुभांगी खळदकर, कोमल बत्तीशे, अंजुम कांबळे, सविता पवार, रोहिणी गरड, बाबा तांबोळी, अंकुश नाळे, कृष्णा पवार, राहुल पलंगे आदि कर्मचारी तसेच काही पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


