आदिनाथ साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे पेमेंट खात्यावर जमा-चेअरमन धनंजय डोंगरे

करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट सव्वा कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे अशी माहिती चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली आहे ते म्हणाले की फेब्रुवारीतील पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे तसेच शेतकरी ऊस उत्पादक यांचेही पेमेंट पूर्वी दिले होते वाहतूकदारांचेही पेमेंट दिले आहे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या

सहकार्य,बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, माजी आ नारायण पाटील व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे आम्ही संचालक बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य होता यामुळेच शेतकरी कर्मचारी वाहतूकदार समाधानी आहेत . तालुक्यातील सभासदांच्या विश्वासपात्र सहकार्यामुळेच आम्ही कारखाना चालू करु शकलो आहोत असे ही अखेर चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले. यावेळी व्हा. चेअरमन रमेश कांबळे, संचालक नितीन जगदाळे, नानासाहेब लोकरे, डॉ. हरिदास केवारे,रामचंद्र पवार, चंद्रहास निमगीरे, अविनाश वळेकर, पांडुरंग जाधव, लक्ष्मण गोडगे, प्रकाश झिंझाडे, नामदेव भोगे, पोपट सरडे,सचिन पांढरे, सौ. स्मिता राजेंद्र पवार, सौ. भामाबाई दिलीप  केकाण यांचेसह कार्यकारी संचालक अरुण बागनवर ओ एस डी हरिदास

डांगे,वर्क्स मॅनेजर प्रल्हाद आटोळे, चिफ केमिस्ट राजाराम खाडे, मुख्य शेती अधिकारी दीपक खटके, चिफ अकौंटंट सतिश पोळ, कार्यालय अधिक्षक मधुकर कदम, सिव्हिल इंजिनिअर सुभाष अभंग, इलेक्ट्रीक इंजीनियर दिपक देशमुख, स्टोअरकिपर शरद काकडे आदीजण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *