
करमाळ्यात हरभरा हमीभाव खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरु :- सुजीत बागल
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य को. ऑप. मार्केटींग फेडरेशन विठ्ठल सर्वसाधारण सह. संस्थेद्वारे करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या सोय व वाजवी दाम मिळण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नातून शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरडधान्य हरभरा खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाल्याची माहिती संस्थेचे सचिव सुजीत बागल यांनी दिली आहे. हरभर्याला हमीभाव दर प्रति क्विंटल

रुपये ५३३५/- इतका आहे. तरी शेतकर्यांनी शेतकरी तपशील फॉर्म, फोटो, ई पिक पाहणी नोंद असलेला ऑनलाईन ७/१२ उतारा, ८अ, पिकपेरा, आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स (आयएफएससी कोड स्पष्ट दिसत असलेले), आधारकार्ड, मोबाईल नं. आदी कागदपत्रांसह संस्थेच्या करमाळा मार्केट यार्ड येथील सोलापूर डिसीसी बँकेशेजारील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक आदिनाथ मोरे यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय हमीभावाप्रमाणे भाव मिळावा यासाठी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप

यांची सुचना, प्रयत्न, सहकार्य व मार्गदर्शनानुसार सदरचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करत असल्याची व यासाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी अधिकारी भोसले यांचे देखील मोलाचे सहकार्य झाल्याची माहिती सुजीत बागल यांनी दिली. तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी नोंदणी करून लाभ घ्यावा असे आवाहन देखील बागल यांनी केले .