
सलाईंसह कुमारी प्रेरणा बाबर या विद्यार्थीने दिला बारावीचा पेपर
करमाळा – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात केंद्र क्रमांक- 0421 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे यांच्या वतीने इयत्ता 12 ची परीक्षा चालू आहे. आज बुधवार दिनांक- 01/03/2023 रसायनशास्त्राचा पेपर सुरू होताना परीक्षार्थी कुमारी प्रेरणा बाबर या विद्यार्थिनी आजारी असताना ॲम्बुलन्ससह परीक्षा केंद्रावर हजर झाली अँम्बुलन्ससह परीक्षा केंद्रावर सलाईनसहित हजर झाली. केंद्र संचालक उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक यांनी अत्यंत तत्परता दाखवून या विद्यार्थिनीचे अत्यंत व्यवस्थित बैठक व्यवस्था केल्याने ती परीक्षा व्यवस्थीत देऊ शकली.

यावेळी केंद्र संचालक यांनी अतिशय प्रेरणा देवून उपचार सुरु करून परी चारीका कु. राजश्री पाटील यानी डॉ.रविकिरण पवार व डॉ. कविता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु ठेवले . तिने सलाईनसह रसायनशास्त्राचा पेपर व्यवस्थीत लिहीला. तसेच या विद्यार्थीनीने परीक्षेची व्यवस्थीत व्यवस्था केल्या बद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. व ती म्हणाली की ब 12 वीचे हे माझे अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष असताना केंद्र संचालक उपप्राचार्य संभाजी किर्दाक , सहकेंद्र संचालक प्रा.लक्ष्मण राख, प्रा.सुवर्णा कांबळे व इतर पर्यक्षेकांनी सहकार्य केल्यामुळे मी परीक्षा देऊ शकले. यामुळे मी सर्वांचे आभार मानते . हा पेपर सुरु असताना डॉ.रविकिरण पवार ,डॉ.कविता कांबळे , डॉ.अमोल घाडगे , डॉ. महेश अभंग , डॉ. सुहास कुलकर्णी , डॉ. सौ वर्षा

करंजकर , डॉ. सौ. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिचारिका राजश्री पाटील यांच्या देखरेखी खाली तिच्यावर उपचार चालू होते. तिने सलाईनसहित परीक्षा दिली. संपूर्ण परीक्षा व पेपर ती व्यवस्थित दिल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एकीकडे आजारी असताना सुद्धा परीक्षा दिल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.