केम येथे इस्त्रीला आलेल्या कपड्यांमध्ये शंकर ससाणे यांना सापडलेले 22,000/- रू प्रमाणिक पणे केले परत त्यांचे तालुक्यांमध्ये कौतुक
केम प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम येथील शंकर ससाणे यांच्या इस्त्रीच्या दुकानामध्ये आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले 22000/- रुपये सापडलेले होते. शंकर ससाणे यांनी विजय बिचितकर सर यांच्याशी संपर्क साधून तुम्ही टाकलेल्या कपड्यांमध्ये 22000/- रूपये आले आहेत ते परत घेऊन जावा असे सांगितले. बघता बघता हि बातमी तालुक्यामध्ये पसरली होती, त्यामुळे शंकर ससाणे यांचे केमनगरी तालुक्यांमधुन कौतुक केले जात आहे. विजय बिचितकर सर यांचे पैसे प्रमाणीकपणे परत दिल्यामुळे केम येथील केम व्यापारी असोसिएन चे व्यापारी संघटना केम अध्यक्ष सागर दोंड यांच्या हस्ते शंकर ससाणे यांच्या सत्कार करण्यात आला होता. यावेळी उपस्थित व्यापारी संघटना अध्यक्ष सागर दोंड, शंकर ससाणे, आदी मान्यवर उपस्थित होते