केम येथील मागील भांडणाच्या वादातुन करमाळयात हाणमार
करमाळा प्रतिनिधी
सुलतान रमजान मुलाणी, वय ३० वर्षे, धंदा शेती, रा. केम ता. करमाळा जि. सोलापूर समक्ष करमाळा पोलीस ठाणेस हजर राहून फिर्याद दिली आहे
माझेकडे एक टाटा कंपनीची विस्टा इंडिका मॉडेलची तिचा आर टी ओ क्रमांक एम एच १३ ए झेड ७४६४ असा असून ती मी घरगुती कामाकरिता वापरत असतो.
दिं. २६/०२/२०२३ रोजी माझे ओळखीचे करमाळा येथील अल्ताफ तांबोळी यांचे मुलाचे लग्न अहमदनगर येथे असल्याने मी माझे मालकीचे वाहनाने माझे सोबत माझ्या मित्र अल्लारखा हुसेन पठाण, अफताब बादशाह मुलाणी, सुदाम राजू मुलाणी खलील मुलाणी, रब्बीसलाम हजरत मलाणी असे मिळून केम येथून ०२/४५ वा निघून करमाळा येथे येत असताना मौलाली माळ येथे ०३/४५ वा आले असताना आमच्या पाठीमागून एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आली व आमचे गाडी समोर रस्त्यावर आडवी लावली त्यामुळे माझे गाडी हे अल्लारखा पठाण हा चालवीत होता त्याने गाडी थांबवली असता समोरील स्कॉर्पिओ मधून अभिजीत तळेकर, सोनू कुरडे, रमेश मखरे, बबलू धोत्रे, निखिल तळेकर सर्व रा. केम ता. करमाळा जि. सोलापूर हे गाडीतून उतरून तसेच त्याचे सोबतचे ५ ते ७ अनोळखी इसमांनी गाडी जवळ येऊन त्यांच्या हातातील लाकडी
काठीने, लोखंडी गजाने, दगडाने, केबलने गाडीच्या पुढील व मागील बाजूच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले त्यानंतर गाडी चालवित असलेला अल्लारखा पठाण यास अभिजीत तळेकर याने गाडीतून बाहेर ओढून त्यास लोखंडी चैनने मारहाण केली असून त्यामध्ये त्यास पाठीवर, खांद्यावर, मनगटावर, डोळ्यावर मारहाण करून त्यास तसेच पठाण यास अभिजीत तळेकर यांना गाडीतून बाहेर ओढून त्याच लोखंडी चैने मारहाण केले असं त्यामध्ये त्यास पाटीवर खांद्यावर मनगटावर डोळ्यावर हल्ला करून त्यास जखमी केले आहे तसेच आफताब मुलाणी यास बबलू धात्रे याने त्याचे हातातील काठीने गुडघ्यावर, डावे हाताचे कोपऱ्यावर, तसेच डावे पायावर मारहाण करून जखमी केले आहे. तसेच रब्बीसलाम मुलाणी यास सोनू कुरडे याने उजवे पायाचे पोटरीवर केबलने मारहाण करूनून जखमी केले. तसेच रब्बेसलाम मुलाणी यास सोनू कुरडे याने उजवे पायाचे पोटरीवर केबलने मारहाण करून जखमी केले. खलील मुलाणी यास निखिल तळेकर याने त्याच्या हातातील दगडाने मांडीवर तसेच डोकीस मारहाण केल्या आहे तसेच आफताब मुलाणी यांचे गळ्यातील दोन तोळे वजनाची चैन व पाकीट भांडणांमध्ये कोणीतरी जबरीने हिसकावून नेली आहे.
तरी दिनांक २६/०२/२०२३ रोजी ०३/४५ वा सुमारास मौलाली माळ रस्ताने करमाळा शहरात जात असताना आमचे पाठीमागून एक पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ आमचे गाडीचे पुढे येऊन रस्त्यावर आडवी उभा करून त्यामधून १) अभिजीत तळेकर, २) सोनू कुरडे, ३) रमेश मखरे, ४) बबलू पवार, ५) निखिल तळेकर सर्व रा. केम ता. करमाळा जि. सोलापूर व ५ ते ७ अनोळखी इसमानी गैर कायद्याची मंडळी जमवून संगणमताने मागील किरकोळ भांडणाचा राग मनात धरून त्याचे हातात काठी, लोखंडे गज, वायर, दगडाने यातील फिर्यादी व त्याचे सोबत असणारे अल्लारखा हुसेन पठाण, अफताब बादशाह मुलाणी, सदाम राजू मुलाणी खलील मुलाणी रब्बीसलाम हजरत मुलाणी यांना मारहाण करून जखमी करून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून माझी त्याचेविरुद्ध फिर्याद आहे