करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जैन इरिगेशन कंपनीला भेट….
शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना व्हावी यासाठी करमाळा तालुक्यातील 200 शेतकऱ्यांनी जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीमच्या कंपनीला भेट देऊन जाणून घेतली शेती संदर्भातील माहीती.
जैन इरिगेशन च्या पुढाकारातून शेतकऱ्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी पिकांचे प्रात्यक्षिक समक्ष पाहून शंकांचे निरसन व्हावे या हेतूने 2 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेतकऱ्यांच्या माहितीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते याचाच एक भाग म्हणून जैन इरिगेशनचे केळी पिक तज्ञ किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत विक्रेते वैभव पोळ बच्चन पिसाळ, सचिन डोके, संतोष पोळ यांच्या सहकार्यातून करमाळा तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये कांदा पिकासंदर्भात भरघोस उत्पादन देणारे नविन वनाचे संशोधन व प्रात्यक्षिक पहाणी शेतीसाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली पाईप ठिबक संच निर्मिती व विविध साधने, केळी डाळिंब व इतर फळ पिकाचे उती संवर्धनातून निर्मिती केलेली रोपे, कांदा व विविध फळाचे काढणी पश्चात तंत्रज्ञान व
प्रक्रिया विविध प्रकारचे पल्प ज्यूस उत्पादन याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली शेवटी जेनेरिगेशनचे केळी पिक शास्त्रज्ञ के.बी.पाटील यांनी केळी पिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला ॲड दिगंबर साळूंके,शरद पाटील, गजेंद्र पोळ,शंकर पोळ,सुहास पोळ,शरद पाटील,मगन पोळ,अक्षय पोळ, संतोष बारकुंड, मनोहर गव्हाणे, काकासाहेब शिंदे,धनाजी शिंदे, अतुल भोसले, संतोष झांजुर्णे, सुनील चव्हाण, नवनाथ गायकवाड,आबासो भोसले, नागनाथ जगताप, काका खताळ, सुनिल मस्के,नरसिंह देवकर,यांच्यासह करमाळा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.