करमाळा नगरपरिषद निधीचे श्रेय मिंदे गटाने घेऊ नये – सुनील सावंत
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगरपरिषद,टाऊन हॉलसाठी निधी मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आ संजय मामा शिंदे यांनी उपलब्ध करुन
दिला आहे याचे श्रेय मिंदे गटाने घेऊ नये अशी टिका सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांनी केली आहे
सावंत म्हणाले वरील दहा कोटीच्या आसपासचा निधी
माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार दिला होता आम्ही स्वतः हा निधी
मिळावा म्हणून आमदार शिंदे यांना भेटलो होतो म्हणून निधीची तरतूद ठाकरे सरकारच्या काळात झाली होती.उलट तुमच्या सरकारने हा निधी स्थगित केला होता असे सावंत यांनी सांगितले आहे