
करमाळा पंचायत समिती कार्यालयात एकही अधिकारी नाही याबाबत मोठे जन आंदोलन करू-अध्यक्ष अतुल खुपसे पाटील
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पंचायत समिती विभागाच्या अंतर्गत असणारे प्रमुख कार्यालयीन एकही अधिकारी उपस्थित नाही याबाबत मोठे आंदोलन उभा करणार असल्याचा ईशारा पत्रकार परिषदेत जनशक्ती संघटना अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला आहे
शिक्षण विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, आरोग्य विभाग,बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, आदी प्रमुख अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित नसतात. त्यांनी नागरिकांना सेवा देण्यासाठी किमान बाजारच्या दिवशी तरी वेळेवर

कार्यालयात हजर रहावे, शुक्रवार हा करमाळ्याचा बाजारचा दिवस आहे. त्यामुळे अनेक नागरिक शासकीय कामकाजासाठी पंचायत समिती येथे येतात. येथेच सर्व शासकीय विभाग आहे. मात्र येथे अधिकारी वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आज मी प्रमुख कार्यालयात जाऊन पहाणी केली तेव्हा अनेकजण हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आम्ही हलचल बुकमध्येही पहाणी केली आहे. मात्र त्यात किरकोळ कारणे दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रोजगारहमी विभाग व जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग येथील अधिकारीही हजर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता मी शासकीय कामकाजासाठी पुणे येथे गेलो आहे. मी कार्यालयात नसलो तरी दुसऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी दिलेली होती. प्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयात वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. जे कार्यालयीन वेळेत बाहेर जात आहेत. त्यांनी त्याची नोंद करणे आवश्यक आहे. जर कोण वेळेत हजर राहत नसेल आणि त्याची नोंद करत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.याबाबत मी प्रत्येक विभागाच्या अधिकारी यांच्याशी बोललो आहे सोमवारी योग्य त्या बाबत सर्व विभागीय अधिकारी यांना बोलवून समज दिली जाईल असे गटविकास अधिकारी राऊत यांनी सांगितले आहे
