प्रहार जनशक्ती कडून कामगारांना मदत
केम प्रतिनिधी
प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील केम गावमध्ये व आजूबाजूचया गावांमध्ये बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. कामगार यांना लागणारे साहित्यही वाटप करण्यात आले होते. त्यानंतर सर्व संघटित असंघटित बांधकाम कामगार व मजूर यांना आज श्री उत्तरेश्वर महाराज यात्रे दिवशी मध्य भोजन जेवण चालू झाले आहे तरी या जेवणाचा लाभ सर्व बांधकाम कामगार मजूर व इतर गोरगरीब लोकांनी घ्यावा ही अशी विनंती

प्रहार संघटनेच्या वतीने व कामगार आयुक्त प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अजून कोणी वंचित कामगार वर्ग राहिला असेल तर यांनी लवकरात लवकर या शासकीय बांधकाम कामगारांची आपली नोंदणी करावी व या शासनाच्या गोष्टीचा लाभ घ्यावा असे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ म्हस्के पाटील व शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे .त्यावेळी उपस्थित प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप भाऊ तळेकर, केम

पोलीस स्टेशनचे जाधव साहेब शिंदे साहेब व इतर पोलीस प्रशासन, प्रहार संपर्कप्रमुख सागर पवार युवा नेते सागर राजे दौंड, पै. शिवाजी भैय्या पाटील पै.मदन तात्या तळेकर, चेअरमन नवनाथ खानट ,भाजप करमाळा तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, भाजप तालुका उपाध्यक्ष पै.दत्ता तळेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे केम गावातील प्रतिष्ठित नागरिक कृष्णा (पपू )राऊत ,हरी सुतार ,बापू गायकवाड ,बापू गलांडे, वसंत गुटाळ, अण्णासाहेब चौगुले, दीपक भिताडे, व इतर गावातील व बांधकाम कामगार वर्ग उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *