करमाळा प्रतिनिधी

जय महाराष्ट्र गणेश मंडळातर्फे दहीहंडी आयोजित करण्यात आली होती. हे या मंडळाचे पहिलेच वर्ष असल्याने  दहीहंडी बघण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, वयस्कर माणसं, गावातील तरुण वर्ग तसेच ग्रामस्थ यांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचा देखील उत्साह बघण्याजोगा होता.

हालगी, तोफा, फटाके व साउंड सिस्टिमच्या गजरात गोविंदा रे गोपाला चा जयघोष कारण्यात आला. लहान – थोर सर्वजण हलगीच्या नादावर थिरकले.

एकंदरीत खुप मोठ्या उत्साहात व जोशात हा पहिलाच दहीहंडी सोहळा निंभोरे गावात साजरा करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *