
करमाळा प्रतिनिधी
आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) संदर्भात ९ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथे आयोजित महामोर्चाच्या संदर्भात शासकीय विश्रामगृह करमाळा येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सोलापूर येथे होणाऱ्या महामोर्चाच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. आलेल्या सर्व समाज बांधवाना मोर्च्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्ह्याचे नेते अभिजित (दादा) ढोबळे, सुरेश पाटुळे, एस एन खंदारे,ज्ञानदेव (मामा) चव्हाण, हनुमंत रणदिवे, रेवणनाथ शिंदे, अभि (आप्पा) पवार, अशोक जाधव, पै. बाळासाहेब पवार (सरपंच हिवरे), दत्ता चव्हाण, दिपक आरणे, रामदास कांबळे, राजु पवार, अक्षय शिंदे, संतोष शिंदे, नगरसेवक रोहिदास आल्हाट, शरद पवार, कपिल मंडलिक, सुनीता पोळ (सरपंच कुंभारगाव), संतोष वायदंडे, संतोष आरणे, सचिन वेळेकर (सरपंच केत्तूर) पै.दादा पवार, गणेश पवार, गणेश कांबळे, शिवाजी जाधव व करमाळा तालुका व खेड्यापाड्यातील सर्वसमाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कदम यांनी केले व आभार दिपक आरणे यांनी मानले.
यावेळी गणेश दत्तू पवार, रावगांव यांची दलित महासंघाच्या करमाळा तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.