
चेअरमन डोंगरेच्या निवासस्थानी आ संजयमामा गेल्यामुळे सावंतांचा पैस्या बाबत तगादा..?
कमलाई नगरी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालू आहे परंतु चेअरमन धनंजय डोंगरे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी बोलल्यामुळे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पैस्याचा तगादा लावला आहे अशी माहिती काही संचालकांनी दिली आहे.
काही दिवसापूर्वी कुगाव येथे एका कार्यक्रमासाठी आमदार संजयमामा शिंदे बारामती अँग्रोचे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे, सरपंच चंद्रकांत सरडे, आदी मान्यवर एका कार्यक्रमानिमित्त आले होते यावेळी या कार्यक्रमास आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे हे पण उपस्थित होते.तो कार्यक्रम संपल्यानंतर चेअरमन डोंगरे यांनी आमदार शिंदे यांना आपल्या निवासस्थानी चहा पाण्यासाठी बोलावले

होते यावेळी आमदार शिंदेही आवरजुन गेले त्यांचा शाल,फेटा, नारळ देऊन येथोचित मान सन्मान चेअरमन डोंगरे यांनी केला तसेच विविध राजकीय चर्चा देखील डोंगरे यांच्या निवासस्थानी झाली याबाबतची बातमी कमलाईनगरीने प्रथम प्रसिद्ध केली होती सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सावंत यांच्यापर्यंत काही हितचिंतकांनी पोहोचवली होती हे पाहताच सावंत….? यांनी व त्यांचे कर्मचारी यांनी डोंगरे यांच्याशी दूरध्वनीहून चर्चा केली तसेच समक्ष भेटण्यासाठी बोलवण्यात आले होते डोंगरे व सावंत यांची चर्चा झाली आम्ही आदिनाथला मदत केली आहे तुम्ही विरोधकांना घेऊन राजकीय चर्चा करत

आहेत याबाबत सावंत बंधूंनी…. बोलून त्यांना दाखवली यावेळी तु तु मी खूपे झाले आता आम्ही दहा कोटी पंचवीस लाख रुपयाच्या आसपास आर्थिक मदत केली होती ती रक्कम आम्हाला परत मिळावी अन्यथा आमचे वाहन आदिनाथ वर पाठवून साखर घेऊन जावु असे सांगितले होते चेअरमन डोंगरे हे हतबल झाल्यामुळे याबाबत बोर्ड मीटिंग बोलवली आहे आता लवकरच पैस्या बाबत निर्णय घेतला जाईल असे काही संचालकांनी सांगितले आहे आ संजयमामा शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे राजकीय वैर आख्या जिल्हाला माहित आहे असे आसताना ही चेअरमन डोंगरे यांनी संजयमामाशी जवळीक साधले हे योग्य नाही असे नारायण पाटील गटाचे संचालक सांगत आहे.

