श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन उत्तम झाले आहे – अध्यक्ष गणेश चिवटे

जेआरडी माझा

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन उत्तम झाले आहे अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना  दिली आहे.विवाह सोहळ्यात एकूण 21 विवाह सोहळा पार पडणार आहेत

 त्यातील एक बौद्ध धर्मीय व हिंदू धर्मीय परंपरेनुसार लग्न विवाह पार पडतील,  वर राजासाठी प्रथमच सामुदायिक विवाह सोहळामध्ये मिरवणुकीत घोड्याची व्यवस्था आहे, वधू साठी सर्व मेकअप साहित्य देण्यात येणार आहे, मिरवणुकीमध्ये आकर्षक आतिषबाजी बॅन्जो व हलगी वादन करण्यात येणार आहे, विवाह स्थळी सुसज्ज असे मंडप व आकर्षक डेकोरेशन करण्यात आले आहे, सर्व वऱ्हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था ही टेबल खुर्च्यांवर करण्यात आले आहे, विवाह स्थळी मनोरंजनासाठी सांस्कृतिक ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे,  विवाह स्थळी ॲम्बुलन्स शौचालय अग्निशामक इत्यादी आवश्यक सुविधा ठेवण्यात आले आहेत,  विवाह स्थळी लग्न मंडपामध्ये जवळपास दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे, वर्हाडी मंडळीसाठी सकाळी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोजन व्यवस्था आहे

या पत्रकार परिषदेसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, आजिनाथ सुरवसे, दासाबापू बरडे,विजयकुमार नागवडे, विनोद महानवर, नाना अनारसे, जयंत काळे पाटील, नितीन चोपडे व श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *