
करमाळयात प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत रेशनमालाचा घोळ
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात डिसेंबर-2022 च्या प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत रेशनमालाचा घोळ
करमाळा तालुक्यातील सर्व गोर-गरीब रेशनकार्ड धारकांना अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा शाखेच्या* वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, सध्या सर्व रेशन दुकानदार हे डिसेंबर-2022 चा केंद्राकडून येणारा प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतील मोफत चा रेशनमाल येणार नाही.(लॅप्स झाला) असे नागरीकांना तोंडी सांगत आहेत.
मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. करमाळा तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार यांना करमाळा तहसिल विभागातून डिसेंबर-2022 चा केंद्राकडून येणारा मोफत चा गहू तांदूळ अगोदरच वितरीत केला गेला आहे.

मात्र काही गावात डिसेंबर-2022 चा केंद्राकडील मोफत रेशनमाल हा वाटला नाही. याऊलट जानेवारी-2023 रेशनमाल वाटला आहे. याचा अर्थ डिसेंबर-2022 चा रेशनमाल लॅप्स झाला असे समजून तो काळ्या बाजारात विकला जाण्याची शक्यता आहे.
तरी ज्या ज्या गावात हा डिसेंबर-2022 केंद्राकडील मोफत रेशनमाल वाटला नाही. तो रेशन दुकानदाराकडून मागून घ्या व त्याची रितसर पावती घ्या.
सर्वसामान्य नागरीकांनी काय करावे.
1) सर्व प्रथम आपण विकत अथवा मोफत घेतलेला रेशनमालाची पावती रेशन दुकानदाराकडून आवर्जुन मागून घ्यावी.
2) आपल्या गावातील रेशन दुकानदाराचे स्टाॅक रजिस्टर पहावे म्हणजे तो दुकानदार रेग्युलर धान्य वाटप करतोय का ते आपल्या लक्षात येईल.

3) रेशन धान्य वाटपात काही घोळ वाटल्यास किंवा जाणवल्यास लगेच रितसर तक्रार नोंदवा.
4) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात तक्रार पुस्तिका ठेवलेली असते. त्यामध्ये आपली सविस्तर तक्रार नोंदवावी. व त्या नोंदवलेल्या तक्रारीची एक प्रत करमाळा ग्राहक पंचायत कडे द्यावी.
5) जर रेशन दुकानदार तक्रार पुस्तिका देण्यास टाळाटाळ करत असेल तर आपल्या गावात रेशन दुकानातील शासकीय धान्य माल व्यवस्थित वितरीत केला जातो का हे तपासण्यासाठी गावात स्थापन केलेली कायदेशीर रेशनमाल वितरण दक्षता समितीकडे तक्रार करावी.
6) मुद्दा क्र. 4 व 5 मध्ये जर आपल्या तक्रारीची नोंद घेतली जात नसेल तर आपण आपल्या गावातील रेशन दुकानदाराची तक्रार तहसीलदार साहेब यांचे नावे सविस्तर लिहावी व त्याची रितसर पोहच घेऊन ती ग्राहक पंचायत कडे द्यावी.
7) जेव्हा रेशन दुकानदार रेशन वाटपा वेळी आपल्या बोटाचा ठसा किंवा थंब घेतो तेव्हा आपण जागरुक असले पाहिजे.
जसे की एकवेळा ठसा घेतला की आपणास एकदा धान्य मिळाले पाहिजे. मात्र अंगठा बसला नाही हे कारण सांगून काही वेळा दुकानदार दोन वेळा आपला अंगठा घेतात त्यावेळी आपणास दोनदा रेशनमाल दिला पाहिजे.
( जेवढ्या वेळा अंगठा तेवढ्या वेळा धान्य)

8) विशेष करुन BPL म्हणजे दारिद्रय़रेषेखालील रेशनकार्ड धारकांना एकूण गहू 25 किलो व तांदूळ 10 किलो असे एकूण 35 किलो धान्य दिले पाहिजे. मात्र काही गावात गोर-गरीब लाभार्थ्यांना या धान्याचे प्रमाण एका व्यक्तीस गहू 3 किलो व तांदूळ 2 कीलो या प्रमाणात दिले जाते. हे चुकीचे आहे.
9) आपली एक तक्रार ही गोर-गरीबांच्या हक्काची भाकर असू शकते.
10) रेशन आपल्या हक्काच.आवाहन कर्ते
शशिकांत मुरलीधर नरुटे अध्यक्षअखिल भारतीय ग्राहक पंचायत ता. करमाळा यांनी सांगितले आहे
चौकट
या संदर्भात तहसीलदार समीर माने यांना फोन लावला असता नायब तहसीलदार बदे यांच्या कडून माहिती घ्या बदे यांना फोन लावला असता आऊट ऑफ रेंज सांगत आहे
चौकट
गोरगरीब नागरिकांना रेशन माल मिळत नाही याबाबत रेशन दुकानदार यास विचारले तर तहसील पुरवठा विभागस भेटा असे सांगितले जाते रेशन दुकानदार टेम्पो भरुन तांदूळ व इतर सामान राजरोसपणे दुसऱ्याला देत आहे – दिपक नागरगोजे, वांगी ता करमाळा