लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने उपेक्षितांचे वंचितांचे वास्तविक जीवन जगासमोर आले . .अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लाख मोलाचे योगदान आहे . अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन एक यज्ञकुंड होते असे प्रतिपादन बाजार समितीचे माजी सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर यांनी वांगी नंबर चार या ठिकाणी व्यक्त केले .

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त वांगी नंबर चार या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी अध्यक्ष स्थानावरून बंडगर
बोलत होते .

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की कादंबऱ्या कथासंग्रह आदींच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी लोक परिवर्तनाचे काम केले .संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्र भर फिरून लोक जागृतीचे काम केले .यामुळे महाराष्ट्राच्या साहित्यिक जगतात परिवर्तन घडून आले .

या कार्यक्रमाला आदिनाथ कारखान्याचे संचालक दत्तात्रय देशमुख ,वांगी जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर गोडसे ‘
सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकिक ‘वांगी चार चे सरपंच रामभाऊ सुळ ‘उपसरपंच भाऊसाहेब शेळके ‘युवा कार्यकर्ते उदयसिंह देशमुख ‘राज शेटे देशमुख , प्रमोद शेळके , सोमनाथ ढावरे , कुमार ढावरे ‘ सौदागर नलवडे सुग्रीव नलवडे आदी उपस्थित होते

उपस्थितांचे स्वागत अण्णासाहेब साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे ‘ चंद्रकांत वाघमारे ,भाऊसाहेब वाघमारे आदींनी आदींनी केले

प्रस्ताविक अर्जुन तकीक यांनी केले तर आभार वांगी चे माजी सरपंच संजय कदम यांना मानले .

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *