
शाळा-शिक्षकांचा विचार करणाऱ्यांनाच पाठिंबा- प्रदेश सचिव
गणेश निळ
कुर्डुवाडी/करमाळा
महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टी असोसिएशन सोलापूर जिल्हा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक दि. ३१ जुलै २०२६ रोजी कुर्डुवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल येथे पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रत्येक ८७ इंग्रजी माध्यम शाळांचे संस्थापक उपस्थित होते.
यावेळी आगामी पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात सेल्फ फायनान्स शाळांचे मतदान मोठ्या प्रमाणात असल्याने सर्वांचा कल सेल्फ फायनान्स शाळांच्या प्रश्नांकडे असल्याचे बैठकीत एकमताने ठरले.
बैठकीत बोलताना संघटनेचे प्रदेश सचिव गणेश निळ म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सेल्फ फायनान्स शाळांचे प्रश्न, आर.टी.ई. अनुदान, मान्यता आणि शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो कोणताही पक्ष किंवा संघटना आमच्या संघटनेचा, शिक्षकांचा, संस्थापकांचा आणि शाळेचा विचार करेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू.” असेही नीळ यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी घाडगे यांनी बैठकीत सेल्फ फायनान्स शाळांसमोरील शासकीय धोरणातील अडचणी, शिक्षक भरती व पगारासंदर्भातील प्रश्न, पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भूमिका तसेच आर.टी.ई. प्रतिपूर्ती रकमे संदर्भात सखोल चर्चा केली. विविध विषयांवर उपस्थितांनी आपली मते मांडली.
या बैठकीत संघटनेचे जयप्रकाश बिले, संतोष वलगे, नितीन भोगे, शरद अनंतकवळे, चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले.यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ओएसडी संतोष साखरे, सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे,
रोंगे सर,कोल्हे सर, स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी,डाँक्टर बारकुंड, डॉक्टर दुरंदे, करमाळा भाजपा अध्यक्ष काकासाहेब सरडे, ज्येष्ठ भाजपा सदस्य संजय घोरपडे, भगवान गिरी
सर्व संस्थापकांनी एकजुटीने संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डुवाडी यांच्या व्यवस्थापनाने केले होते.
नुतन भाजपा जिल्हाध्यक्ष पदी गणेश चिवटे यांची निवड झाल्याबद्दल मेस्टा एफ संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला होता
….
आज इंग्रजी माध्यमाच्या शाळा आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमध्ये सापडल्या आहेत. शासनाने सेल्फ फायनान्स शाळांना न्याय द्यावा. शिक्षकांना वेळेवर पगार आणि शाळांना पायाभूत सुविधा मिळाल्याशिवाय गुणवत्तापूर्ण शिक्षण शक्य नाही. आमच्या मागण्या मान्य करणाऱ्या उमेदवारालाच आम्ही पाठिंबा देऊ.” – अमोल सुरवसे, संस्थापक, आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डुवाडी
…..
मेस्टा एफ स्वयं अर्थ शाळेच्या सर्व संस्थापक अध्यक्ष यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावण्याचे नियोजन करतो- ओएसडी
संतोष साखरे,
…..
सोलापूर जिल्ह्यातील स्वयं अर्थ शाळेच्या अडीअडचणी आपण अधिकारी व वरिष्ठांसमोर मांडल्या आहेत नक्कीच आता साखरे सो व वरीष्ठ नेत मंडळी आम्ही आपले विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू या- गणेश चिवटे, जिल्हाध्यक्ष भाजपा सोलापूर
