करमाळा प्रतिनिधी

भक्ती मधे समझदारी नसेल तर, ती आंधळी भक्ती होते आणि हीच आंधळी भक्ती माणसाची सगळ्यात जास्त दुष्मण बनते. समाजजीवनात माणसं चमत्कारावर विश्वास ठेवून त्या अपेक्षेवर जगायला बघतात. नोकरी नाही मिळाली की, ग्रह खराब आहे म्हणतात. आजारपणामुळे त्रस्त झाले की, कोणीतरी करणी केलीय म्हणतात. धंद्यामध्दे बुडाला की,भगवान नाराज आहे म्हणणार. पण् सत्य हे कडू असते. माणसांची बरबादी ही भगवान नाही तर त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे होते. चांगली वर्तणूक न ठेवता चुकीच्या लोकांची संगत ठेवणे. क्रोध आणि आळस यांवर नियंत्रण न ठेवणे आणि फक्त चांगलं व्हावं म्हणून कर्मकांडे करत बसणं. अहोरात्र देवांची पूजा पाठ करण्यामध्ये वेळ बरबाद करणे. एव्हढे करून प्रगती नाही झाली की, देवाला शिव्या देणे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव असं कदापि होणारं नाही. प्रत्येकांच्या हरेक दुःखाची भगवान परिक्षा घेत नाही. देव तुमचं काही घेत नाही आणि तुम्हाला काही देत पण् नाही. तुम्ही तुमची नियत बिघडू न देता चांगले कर्म करा. खरा परमेश्वर चांगल्या कामांत शोधा तो नक्कीच तुम्हाला भेटेल.

शणिशिवपूर (पोथरे) ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात निंभोरे येथे वारकर्या समोर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निंभोरे गावचे सरपंच रविंद्र वळेकर हे होते तर व्यासपीठावर दिंडी संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अॅड. डॉ. बाबूराव हिरडे, शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकभाई खाटेर, अंनिसचे अनिल माने, राजेंद्र साने, संजय हंडे, राजेंद्र रणसिंग, प्राचार्य नागेश माने, एन डी सुरवसे, कवी प्रकाश लावंड, बाळासाहेब गोरे सर, पोथरे गावचे माजी सरपंच हरिभाऊ झिंजाडे, नानासाहेब पठाडे, किसन आबा झिंजाडे, लष्कर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, कल्पना मंथन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करूण पायीं दिंडी सोहळा निर्व्यसनी होऊन साजरा करत रहा. शेतीमध्ये आणि व्यवसायामध्ये वेगवेगळ्या कल्पनांमधून सुचलेल्या सर्जनशील विचारांची पेरणी करा म्हणजे पायी दिंडी सोहळ्याचे सार्थक होईल. संतांनी दाखवलेला देव तुम्ही शोधा तो नक्कीच तुम्हाला पावलों पावली भेटल्याशिवाय राहणार नाही. स्वतः साठी केलेल्या किमात स्वार्थ असतो, आणि दुसर्यासाठी केलेल्या कामात देव. आता ठरवा तुम्हीच देव देव करत बसायचं का संतांचा देव शोधायचा. असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

यावेळी त्यांनी विविध अचाट मंत्र शक्तिने पुळचट चमत्काराच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून त्या चमत्कारामागिल कार्यकारण भाव समजून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. डॉ. बाबूराव हिरडे यांनी केले तर आभार नानासाहेब पठाडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *