
करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला ‘मदनदास देवी’ यांचे नाव देण्यात येत आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे राज्यमंत्री अँड. मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, करमाळा येथे पार पडणार आहे. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बगवेवाडी आणि प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, हा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.