करमाळा प्रतिनिधी

पद्म पंडित प्रतिष्ठान कंदर या सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 500 विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप करण्यात येणार आहे. सोमवार दि. 15 जून रोजी जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप केंद्रशाळेअंतर्गत गावचे सरपंच, उपसरपंच, कारखान्याचे आजी-माजी संचालक, बाजार समितीचे आजी-माजी संचालक, चेअरमन, व्हा. चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,

तंटामुक्ती अध्यक्ष, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत इंगळे वस्ती (कंदर), भांगेवस्ती (कंदर), पाटणे वस्ती (कंदर), पुनर्वसन गावठाण (कंदर), माने वस्ती (कंदर), पवार वस्ती (कंदर), सातोली, पन्हाळकर वस्ती (वडशिवणे), वडशिवणे येथे वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पद्म पंडित प्रतिष्ठान कंदरचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *