करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोशिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे येथील आनंदी लोन्स मंगल कार्यालय येथे खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात संपन्न झाली. मंगल कार्यालय चालक व मालकांच्या विविध अडचणी, शासनस्तरावरून लागू करण्यात येणारे नियम व अटी, शुभमंगल कार्याच्या आयोजनासंदर्भातील अडचणी तसेच संघटनेच्या माध्यमातून सदस्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव घुमरे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सचिव बाळासाहेब होशिंग, तसेच धर्मराज आवटे, जयराम सोरटे, मोहसीन नालबंद, मोहन टिकोरे, विनोद शिंदे, गणेश मंगवडे, संदीप बोकन, तानाजी महामुनी, संदीप रोडगे, दिगंबरराव झोळ, दत्तात्रय भुजबळ, अनिल कादगे, आदी मंगल कार्यालय चालक व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विलासराव घुमरे म्हणाले की, मंगल कार्यालय व्यवसायाशी संबंधित अनेक बाबींवर शासनाकडून वेळोवेळी विविध नियम व अटी लागू केल्या जातात. या नियमांची अंमलबजावणी मालकांना काही व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी केवळ वैयक्तिक पातळीवर न मांडता संघटनेच्या माध्यमातून एकत्रितपणे शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे.

मंगल कार्यालय व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन स्तरावर योग्य पद्धतीने मांडण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. शुभमंगल कार्याशी संबंधित अडचणी असोत किंवा मंगल कार्यालयांच्या व्यवसायाशी निगडित प्रशासकीय प्रश्न असोत, सदस्यांच्या हितासाठी संघटना ठामपणे उभी राहील, असे घुमरे यांनी स्पष्ट केले, सचिव बाळासाहेब होशिंग यांनीही बैठकीत मार्गदर्शन करताना करमाळा तालुक्यातील मंगल कार्यालय असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक सदस्याची अडचण ही संघटनेची अडचण मानून त्यावर सामूहिकपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. सदस्यांनी आपापल्या समस्या व सूचना असोसिएशनसमोर मांडाव्यात, त्यांचा वा योग्य योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान मंगल कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सदस्यांनी आपली मते मांडली. शासनाच्या नियम-अटींची ची पूर्तता पूर्तता क करताना येणाऱ्या अडचणी, शुभमंगल समारंभांच्या आयोजनातील विविध बाबी, ग्राहकांच्या अपेक्षा, प्रशासकीय प्रक्रिया तसेच भविष्यात मंगल कार्यालय व्यवसायासमोरील आव्हाने याबाबत विचार विनिमय करण्यात आला. संघटनेच्या माध्यमातून सदस्यांमध्ये सातत्याने संवाद राहणे, परस्पर सहकार्याची भावना वाढविणे आणि सर्व सदस्यांच्या हिताचे प्रश्न एकत्रितपणे सोडविणे आवश्यक असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. तालुक्यातील मंगल कार्यालय चालक व मालकांनी एकत्रितपणे काम केल्यास शासनस्तरावरील प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असा सूर बैठकीत व्यक्त झाला. मंगल कार्यालय हा विवाह, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या व्यवसायाशी संबंधित अडचणींचे योग्य पद्धतीने निराकरण होणे आवश्यक आहे. यासाठी भविष्यातही नियमित बैठका घेऊन सदस्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचा आणि आवश्यकतेनुसार संबंधित प्रशासन व शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

मासिक बैठकीच्या निमित्ताने सर्व सदस्यांमध्ये सकारात्मक संवाद झाला. संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याबरोबरच ‘सदस्यांच्या प्रश्नांसाठी संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून प्रश्नांचा पाठपुरावा’ या भूमिकेतून पुढील काळात काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

बैठकीत विविध विषयांवर झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे मंगल कार्यालय असोसिएशनच्या आगामी कार्याला अधिक बळ मिळणार असून, तालुक्यातील मंगल कार्यालय लकांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *