करमाळा प्रतिनिधी

इयत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा दिनांक 11-6-2026 रोजी यशकल्याणी सेवाभवनामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष भर्तरीनाथ अभंग यांनी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्री यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख व्याख्याते डॉ.गणेश भाऊ करे पाटील यांनी इयत्ता दहावी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले. नोकरीच्या मागे न लागता आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे

त्या गोष्टीत यश मिळवावे. फक्त प्रमाणिकपणे कष्ट केले व जिद्द ठेवली तर सर्व मिळते. मोबाईलवर जास्त वेळ न राहता पुस्तके वाचावीत, बाहेर देशात भ्रमंती करून माहिती मिळवावी आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनात करावा. असे मार्गदर्शन त्यांनी केले. शहरातील व तालुक्यातील दहावी व बारावी मधील 40 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रोहिदास सातव, ललिताताई शिरसकर, ज्ञानदेव अनारसे, डॉ. महेश अभंग, नेमचंद भुजबळ,

सुभाष अभंग, दत्ता भुजबळ, सुरेश शिंदे, शहाजी मोहोळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच महिलांचापण सहभाग होता. सदर कार्यक्रम क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने सुनीलजी बनसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमासाठी अर्जुन आगम, विवेक अवसरे, सागर बनकर, विशाल बनकर, अमोल नाळे, मयूर यादव, अशोक ननवरे, समाधान दगडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक जगन्नाथ जाधव सर यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळू दुधे सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *