करमाळा प्रतिनिधी

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी (कार्यक्षेत्र: माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी) तुषार जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना सोशल मीडिया राज्यप्रमुख प्रतीक दादा शर्मा व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख महादेव सरवदे तसेच शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे, लोककल्याणकारी योजना आणि विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत व घराघरांमध्ये अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी तुषार जाधव यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांचा दांडगा अनुभव आणि जनसंपर्क लक्षात घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि सर्वच स्तरातून तुषार जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोशल मीडियाचे संघटन या चारही तालुक्यांत अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

………………….

शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर तुषार जाधव यांनी पक्षाचे आभार मानत म्हटले : “पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेची ध्येयधोरणे आणि लोककल्याणकारी योजना घराघरांपर्यंत पोहचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *