करमाळा प्रतिनिधी
विद्यमान आमदारांनी दोन वर्षात विकासकामात काय भर टाकली याचाही लेखाजोखा जनतेसमोर आला पाहिजे.डिकसळ ते कोंढार चिंचोली पुलाची मंजुरी माजी आमदार. संजयमामांनीच आणली- सौ. वनिता सुभाष गुळवे. जिल्हा परिषद सदस्या
– करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील असणाऱ्या डिकसळ ते कोंढारचिंचोली दरम्यानच्या नवीन होणाऱ्या पुलाची मंजुरी ही माजी आमदार. संजयमामांनीच आणली याबाबत बारामती अग्रोचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष (आबा)गुळवे यांनी प्रत्यक्ष स्थळपहाणी करताना सांगितले होते. यावरून पाटील गटाचे प्रवक्ते तळेकरांनी श्रेयवादा विषयी वक्तव्ये केली असुन.. याबाबत कोर्टी जिल्हा परिषद सदस्या सौ. वनिताताई सुभाष गुळवे यांनी स्पष्ट शब्दात मत व्यक्त केले आहे की, या नवीन पुलाचे कामासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे पाठपुरावा केलेला होता. या पुलासाठी ५५ कोटी मंजुर झाल्यानंतर पुढे मा.अजितदादा सरकारमधून काही दिवस बाहेर राहीले होते. याचा गैरफायदा घेऊन कॉन्ट्रक्टर वर कोणी कसे दबाव आणले व काम कोणी प्रलंबित ठेवायला भाग पाडले. याचा सर्व हिशोब जनतेकडे आहे. चालु दोन वर्षात आपण किती विकासकामे मंजुर करून आणली आहेत आणि मामांनी त्यांचे पाच वर्षात किती कामे मंजुर केली याचा सर्व लेखाजोखा पाटील गटाने मांडला पाहिजे. मात्र प्रत्येक विकासात्मक गोष्टींना सोईस्करपणे बगल देण्याचे काम ज्या पाटील गटाच्या नेत्यानी व प्रवक्त्यांनी वारंवार केले आहे. तालुक्याच्या विकासकामांचा चालु दोन वर्षात किती पाठपुरावा केला आहे? याचेही उत्तर दिले पाहिजे. वस्तुस्थितीने नेत्यांनी केलेल्या विकासकामांना तराजुत मोजण्याचे काम जनता करत असते. त्यामुळे विकासकामांच्या तराजुत माजी आमदार.संजयमामा शिंदे हेच वजनदार राहतील. आणि डिकसळ- कोंढार चिंचोलीच्या पुलाचे श्रेय त्यांचेच आहे.करमाळा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी नियोजन बद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. माजी आमदार. संजयमामा शिंदे यांनी तालुक्यासाठी आणलेली कोट्यावधीची मंजुर विकासकामे आता दिसु लागलेली आहेत. डिकसळ ते कोंढार चिंचोली या महत्वाचे पुलाचे कामही माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पाठपुराव्याचे यश आहे. ते काम निरंतरपणे चालु राहील यासाठी देखिल प्रशासनाला योग्य त्या सुचना वेळोवेळी दिलेल्या आहेत. बारामती अग्रोने देखिल या ठिकाणच्या रस्ते पुलासाठी आवश्यक त्या वेळी सहकार्य केले आहे. येथे साकारणारा नवीन पुल लवकरच उभारावा अशी जनसामान्यांची भावना आहे.