करमाळा प्रतिनिधी

संत स्वामी रघुराज महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या प्रेरणेतून वै. ह.भ.प. हरिदास नाना परशुराम डोंगरे पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त श्री संदेह हरण ग्रंथ पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक तथा छत्रपती मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हरिदास डोंगरे पाटील यांनी बिटरगाव (सांगवी) तालुका करमाळा येथे केलेले आहे.

या सप्ताहात श्री संत भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था जवळाला ता. पाटोदा यांचा दररोज काकडा व हरिपाठ होईल. शनिवार दिनांक 2 मे रोजी सकाळी सात वाजता ग्रंथ पूजन, विना पूजन व ध्वज पूजन होऊन संदेह-हरण ग्रंथ पारायण सुरू होईल. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर, ह.भ.प. अण्णा महाराज निंबाळकर, ह.भ.प. अनिरुद्ध महाराज निंबाळकर, ह.भ.प. अण्णा महाराज तुकाराम निंबाळकर बिटरगाव हे असणार आहेत.

शनिवारी दिनांक 2 मे रोजी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे कीर्तनसेवा होईल.  3 मे रोजी भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे रात्री आठ ते दहा पर्यंत कीर्तन सेवा होईल. 4 मे रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत संत स्वामी रघुराज महाराज यांचे नववे वंशज ह.भ.प. गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे कीर्तन सेवा होईल.

4 मे रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा बिटरगाव येथे करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *