
करमाळा प्रतिनिधी
कंदर येथील संदीप पराडे यांच्या शेतात घेतलेली केळी, डाळिंब आणि अद्रक या पिकांची पाहणी करण्यासाठी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील आमदारांच्या पुत्रांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट दिली.

यामध्ये बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील भाजप आमदारांचे सुपुत्र समर्थ चिटणीस आणि त्यांच्यासोबत आलेले किशोर पाटील जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी समिती सभापती बुऱ्हाणपूर व राहुल पाटील माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष बुऱ्हाणपूर मध्यप्रदेश तसेच जळगाव येथील शेतकरी व KD Export चे किरण डोके तसेच जैन इरिगेशन चे ॲग्रोनॉमिस्ट किरण पाटील व रमेश पराडे उपस्थित होते.

संदीप पराडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जोपासलेली केळी, डाळिंब आणि अद्रक या पिकांची गुणवत्ता व पिकांची सुदृढ वाढ आणि उत्तम व्यवस्थापन पाहून सर्व पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथील आमदार पुत्र चिटणीस व त्यांच्या टीम यांनी पराडे यांच्या कष्टाचे आणि शेतीतील प्रयोगांचे कौतुक केले. या भेटीमुळे कंदर परिसरातील प्रगतशील शेतीची दखल आता राज्याबाहेरही घेतली जात असल्याचे दिसून येते. सप्टेंबरमध्ये युनायटेड किंगडम देशातील जागतिक बँकेच्या सल्लागार लुशी म्याथुसन यांनीही पराडे यांच्या शेतीला भेट दिली होती.
