
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 97 वा मन की बात कार्यक्रम संपन्न
करमाळा प्रतिनिधी
26 जानेवारी
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेले परेडमध्ये वेगवेगळ्या राज्याच्या सांस्कृतिक देखाव्याने सर्व देशवासियांची मने हर्ष,उल्हासीत झाली विशेषता सीआरपीएफ ची महिला तुकडी तसेच उंटावरील महिला रायडर या नारी शक्तीचे दर्शन परंपरा यामधून दिसत होती
असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 97 व्या मन की बात मध्ये व्यक्त केले आज मोजे राजुरी येथे प्रसारण कार्यक्रम संपन्न झाला
25 जानेवारी रोजी पद्म पुरस्काराची घोषणा झाली यामध्ये विशेषता आदिवासी भागातील जनजाती यामधील बहुतांश कार्यतत्पर गुणीजनांना गौरवण्यात आले तसेच नक्षलग्रस्त भागातील अनन्यसाधारण काम करणाऱ्या गोंडा युवकांनाही गोरण्यात आले त्यांचा आजपर्यंतचा सेवाभाव, निरपेक्ष वृत्ती, राष्ट्रभाव अशा समर्पण भावामुळे त्यांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मोदीजींनी यावेळी इंडिया द मदर ऑफ डेमोक्रॅटिक या नुकतंच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल वेगवेगळ्या पैलू समोर आणल्या या राष्ट्राचं लोकतंत्र याबाबत तामिळनाडू येथील अतीर मेरुर येथे अकराशे ते बाराशे वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला आहे या शिलालेखांमध्ये ग्रामसभा कशी करावी तसेच त्यांच्या सदस्यांची निवडीची प्रक्रिया कशी असावी याबाबत उल्लेख आढळतो तसेच बाराव्या शतकामधील महात्मा बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम मध्ये चालणारी कार्यपद्धती याबाबती

अनेक गोष्टी कथन केल्या मिलेट्स [बाजरी] याबाबत संपूर्ण देशांमध्येच वेगवेगळ्या मेनू दारे कॅफे, रेस्टॉरंट, हॉटेल्स या ठिकाणी सर्वांच्या पसंतीस कसे उतरत आहे हे त्यांनी सांगितले यावर्षी गोवा पणजी येथे निरामार बीच येथे सहा जानेवारी ते 8 जानेवारी यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी पर्पल फेस्ट 2023 हा 50 हजार च्या आसपास दिव्यांग बांधवांचा स्नेह मेळावा संपन्न झाला यामध्ये नृत्य ,खेळ, फनी फिल्म क्वीझ याद्वारे दिव्यांग बांधवांच्या आनंद द्विगुणित होण्यासाठी हा अनुपम उपक्रम संपन्न झाला

कश्मीरच्या बाबतीत बोलायचे झाल्यास यावेळी तेथील बर्फ पाहून काश्मीर जणू स्वर्गच आहे का असे आपण सोशल मीडियाद्वारे पाहिला आहे हे आनंददायी चित्र निश्चित असले तरी आपणही काश्मीरला का जाऊ नये अशी मनामध्ये भावना निश्चितच प्रत्येकाच्याच मनामधे व्यक्त होते आणि आपणही ते पाहिलं पाहिजे असा संवाद त्यांनी साधला अशा देशातील वेगवेगळ्या विषयावर मन की बात मध्ये त्यांनी भारतीयांची संवाद साधला
राजुरी चे सरपंच डॉ. अमोल दुरंदे, नरेंद्रसिंह ठाकुर रामदास शिंदे, नवनाथ दुरंदे, गणेश जाधव, संतोष गदादे, रोहित गायकवाड, नागेश मोरे, शंतनु दुरंदे, राहुल पाटील, अक्षय पाटील ,गणेश मोहिते, रेवन बोबडे आदी उपस्थित होते..
