
इरा पब्लिक स्कूल मध्ये हळदी-कुंकू व वीरांगणा 2023 खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
करमाळा प्रतिनिधी
आज शनिवार दिनांक 28/01/23 रोजी इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे महिला पालक मेळावा व हळदी- कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सौ.ज्योती नारायण(आबा)पाटील व सौ प्रियंका नितीन खटके या प्रमूख पाहुण्यांच्या हस्ते जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महिलांनी आपल्या सुप्त गुणांचे प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी नकला, उखाणे, गाणे, भारुडे यांचे सादरीकरण केले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात महिलांनी स्वतःला कसे सदैव तत्पर ठेवावे याचे मार्गदर्शन केले. स्त्री ही सर्व भूमिका अगदी ठामपणे पार पाडू शकते याचे त्यांनी आपले स्वतःचे अनुभव सांगितले.

खास महिलांसाठी असा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल इरा पब्लिक स्कूल चे सर्वांनी आभार मानले.
कार्यक्रम अधिक रंगतदार झाला तो महिलांसाठी आयोजित केलेल्या “वीरांगना 2023 :खेळ रंगला पैठणीचा”यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, फुगे फोडणे, पासींग रिंग अशा खेळांचा समावेश होता. यामध्ये सर्वच महिलांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक जनींनी आपणच ही स्पर्धा जिंकणार या जोशात सहभागी झाल्या होत्या.
शेवटी अटीतटीच्या या स्पर्धेत बाजी मारली सौ. प्रियंका अजय सोळंकी(जेऊर) व सौ.सुवर्णा शिवाजी गव्हाणे(चिखलठाण) .या विजेत्या महिला पालकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आले.

सर्व महिला पालकांना व त्यांच्या बरोबर आलेल्या लहान बालगोपाळाना अल्पोपहार देण्यात आला.
सर्व महिला पालक कार्यक्रमाच्या शेवटी संगीताच्या तालावर थिरकल्या.
सर्व विद्यार्थ्यांचे युनिट टेस्ट चे पेपर महिला पालकांना दाखविण्यात आले.
हा कार्यक्रम अगदी शिस्तबद्ध व सुनियोजित पार पाडण्यासाठी सर्व महिला शिक्षक व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

