करमाळा प्रतिनिधी

नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा लागु झाल्यास करमाळा विधानसभा मतदारसंघाची फेररचना होईल मत आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केले. काल महिला आरक्षण विधेयक, 2023 (ISO 15919 : नारी शक्ती वंदन अधिनियम) या नावाने ओळखला जाणारा संविधान (एकशेवी सुधारणा) कायदा हा विशेष बिल सादर करुन फास्ट ट्रॅक वर आणण्यासाठीचे वृत्त राष्ट्रीय प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते. यामुळे आता सन २०२९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदार संघाची पुनर्रचना निश्चितपणे केली जाणार आहे. सन २०११ च्या जनगणनेवर आधारीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महिलांचे आरक्षण पडले जाणार आहे.

वास्तविक पाहता नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा 19 सप्टेंबर 2023 रोजी संसदेच्या विशेष सत्रादरम्यान लोकसभेत सादर करण्यात आला. कायदा थेट निवडून आलेल्या लोकसभा, राज्य विधानसभा आणि दिल्ली विधानसभेतील ३३ टक्के जागा महिलांसाठी देण्याचा प्रयत्न करतो. आता या कायद्यास विधेयकाद्वारे हिरवा कंदील दाखवला गेल्याने सन २०२९ मधील विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी मतदार संघ पुनर्रचना निश्चित केली जाईल. तसेच महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील ५० टक्के विधानसभा मतदारसंघ फेर रचना होऊन वाढले जाणार आहेत. यामुळे काही नवीन विधानसभा मतदारसंघ तयार केले जातील. या कायद्यामुळे करमाळा तालुक्यातील ११५ गावांचा समावेश असलेला विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येणार आहे. पुर्वी केवळ करमाळा तालुक्यातील गावांचा समावेश असलेला मतदार संघ अस्तित्वात होता. कदाचित करमाळा विधानसभा मतदार संघास जोडलेली कुर्डूवाडी सह छत्तीस गावे करमाळा मतदार संघापासुन विभक्त होण्याची दाट शक्यता आहे. जरी सध्याचे पाठबळ विचारात घेतले तरी करमाळा तालूक्यात विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना तब्बल ५१ हजार इतके मतदान प्राप्त असुन बागल, शिंदे, जगताप व मोहिते पाटील या सर्वांना मिळून एकत्रितपणे ६२ हजार मते प्राप्त आहेत. २०२४ मधील विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी व सध्याचे जनमत लक्षात घेतले तर तालुक्यातील बागल व शिंदे यांच्या गटापेक्षा पाटील गट करमाळा तालूक्यात तब्बल वीस हजार मतांनी आघाडीवर आहे. यावरुन जर हा कायदा लागू झालाच तर याचा सर्वाधिक फायदा आमदार नारायण आबा पाटील गटास होईल. आणि जरी हा कायदा अंमलात आणला गेला नाही व सध्याची स्थिती जैसे थे राहीली तरी आमदार नारायण आबा पाटील यांचे पारडे आगामी विधानसभा निवडणुकीतही जड असणार आहे. करमाळा मतदारसंघास जोडलेल्या कुर्डूवाडीसह छत्तीस गावात आमदार नारायण आबा पाटील यांनी मागील टर्म सारखाच या टर्म मध्येही विकासाचा पॅटर्न कायम ठेवलेला आहे. या छत्तीस गावांसाठी या वर्षभरात स्थानिक विकास निधी (आमदार फंड), जिल्हा नियोजन मंडळातील निधी यातुन भरीव अशी विकासकामे मंजूर करून दिली आहेत. तसेच या भागावर विशेष लक्ष देऊन आपली पकड अधिक बळकट केली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही पाटील गटाचीच सत्ता करमाळा विधानसभा मतदारसंघावर कायम राहील व विद्यमान आमदार नारायण आबा पाटील हे आमदारपदाची हॅटट्रिक पुर्ण करुन तिसऱ्यांदा आमदार होतील अशी खात्री पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *