करमाळा प्रतिनिधी भिलारवाडी ता करमाळा येथे जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मिनी फॉरेस्टचा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला
पुणे येथील आशीर्वाद ग्रोथ फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण रक्षणाचा एक प्रयत्न म्हणून लोकसहभागातून या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे याच्या वसुंधरा अर्पण करण्यात आले. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले पुणे येथील पुष्पौषधी व पर्यावरणतज्ञ अंजली साठे, ऑस्मोफ्लो कंपनीचे मकरंद केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थान यावेळी बोलताना पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्ण म्हणाल्या की पर्यावरण रक्षणासाठी आशिर्वाद ग्रोथ फाऊंडेशनचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व इतरांना मार्गदर्शक आहे. त्यांच्या कार्यामध्ये सातत्य असून त्याचे अनुकरण इतरांनी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना सविता देवी राजे भोसले म्हणाल्या की माणसाच्या जीवनामध्ये वृक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड संवर्धन काळाची गरज आहे. पर्यावरण तज्ञ अंजली साठी यांनी जागतिक व राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण जागृतीसाठी होत असलेले प्रयत्न व चांगल्या आरोग्यासाठी सध्या सेंद्रिय शेती गरज याविषयी उपस्थित त्यांना माहिती दिली. प्रास्ताविक करताना आशिर्वाद ग्रोथ फाऊंडेशनचे सुनील चौरे म्हणाले या ठिकाणी यापूर्वीही अशा प्रकारच्या पाच युनिटची निर्मिती करण्यात आलेली आहे. यावेळीही याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या १७६ वृक्षांची लागवड केली आहे या मिनी फॉरेस्ट मधील वनौषधींचा लोकांच्या आरोग्यासाठी उपयोग होणार असून भविष्यात यासाठीही विशेष प्रयत्न केले जाणार आहेत यावेळी भिलारवाडीचे माजी सरपंच रामभाऊ येडे डॉ विद्या चोरे , बेल्हे ग्रामपंचायत सदस्य मंदाकिनी नायकोडी गजेंद्र पोळ,मुकूंद शिंगाडे, सुनंदा नायकोडी
तात्यासाहेब वायसे ऑस्मोफ्लो कंपनीचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह पुणे येथील फाउंडेशनचे सहकारी व परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *