करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहर व तालुकयात दोन नंबर धंदे फोफावत आहे यामुळे युवक वर्ग बिघडत आहे तरी वरीष्ठ पातळीवरून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली आहे.

मागील काही दिवसात करमाळ्याचे नाव राज्यभर चर्चेत आले आहे. येवढ्या मोठ्याप्रमाणावर गांजा तस्करी, एम डी ड्रग्स विक्री, बनावट दारु व युवकांमध्ये इंजेक्शनचे वाढते प्रमाण यामुळे युवक वर्ग देशोधडीला लागला आहे तरी वरीष्ठ पातळीवरून याचा लवकरच बंदोबस्त करावा असे अध्यक्ष तांबोळी यांनी सांगितले आहे