करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने करमाळा ग्रामीण व शहरी भागातुन मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. यावेळी नमाज पठण मौलाना मुश्ताक नीसार काझी यांनी केले व खुतबा पठण करमाळा तालुका आणि करमाळा शहर काझी मुजाहिद मोहम्मद खलील काझी यांनी केले. यावेळी बांगलादेशात हिंदु बांधवांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध केला. द्वेष

भावनेन देश चालणार नाही हे सर्वांनी समजुन घ्यावे. आपली एकता आपल्या देशाची मोठी  ताकद आहे. राज्य सरकारने तसेच केंद्र सरकार ने मॉब लींचीग वर तात्काळ कायदा करावा कारण परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे त्यासाठी कायदा करणे महत्वाचे आहे अशी मागणी केली. इराणवर झालेला हल्लाचा जाहीर  शब्दात निषेध असे शहर काझी यांनी सांगीतले. अमेरिका आणि इस्राईल जागतिक आतंकवादाचे केंद्र आहेत. त्यांनी निरपराध लोकांना व लहान मुलांना मारले आहे. त्यांना इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने फाशी द्यावी अशी मागणी केली. सद्यस्थितीत काही राजकारणी, न्युज चॅनेल, काही चित्रपट निर्माते समाजात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे पण जनता याला बळी पडणार नाही असे शहर काझी यांनी सांगीतले. जय जवान- जय किसान – हिंदुस्थान झिंदाबाद.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *