करमाळा प्रतिनिधी
पंचायत समिती परिसरात विरोधकांच्या काळात एजंट होते अशी माहिती माजी सभापती शेखर गाडे यांनी दिली आहे. यावेळी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन रमेश कांबळे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना मा. सभापती गाडे म्हणाले की, 2012 ते 2017 च्या काळात विरोधी गटाच्या सत्तेच्या प्रसंगी पंचायत समितीच्या सर्व आँफिस परिसरात एजंट फिरत होते. शिक्षण विभागातील शिक्षक बदली रेट कार्ड वेगळा होता, घरकुल घोटाळा प्रकरण त्यांच्या काळात गाजले होते. विहिरींचा घोटाळा त्यांच्याच काळात झाला आहे.
आमच्या काळात महाराष्ट्रात घरकुलाचा पहीला नंबर होता. विरोधकांचेही आमदार नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीबांना निधी दिला होता. बांधकाम विभागाचे रेट कार्ड अधिक होते. पाणी पुरवठा विभागातही वेगळा रेट होता. असे रेट कार्ड विरोधक त्यांच्या बंगल्यावरून ठरवत होते. त्यामुळे विरोधकांनी आमच्याकडे बघण्या ऐवजी आपण किती घाण पुर्वी केली होती ती आतातरी दुरुस्त करावी या संदर्भात आमच्या कडून त्यांना शुभेच्छा असेही अखेर माजी सभापती शेखर गाडे यांनी सांगितले.