पुणे प्रतिनिधी

स्वप्निल फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पुरस्कार सोहळा यंदाही उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, उद्योजकता, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आपल्या कार्याचा सविस्तर प्रस्ताव आवश्यक पुराव्यासह दिनांक १० मार्च २०२६ पर्यंत संस्थापिका शोभाताई बल्लाळ यांच्याकडे या नंबरवर 9860634764 पाठवावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पुरस्कार वितरण समारंभ २३ मार्च २०२६ रोजी, सकाळी 11 ते 2 या वेळेत सावित्रीबाई फूले सभागृह, पुणे येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून गुणवंत महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात येईल.

इच्छुकांनी आपले प्रस्ताव वेळेत सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वप्निल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *