
करमाळा प्रतिनिधी
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सोलापूर पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या माध्यमातून बिटरगांव (वांगी) परिसरातील दोन रस्ते कामांसाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीतुन निधी मंजूर करण्यात आला आहे. वांगी १ ते मंगवडे वस्ती रस्त्यासाठी २० लाख रुपये, तसेच श्री रघुराज महाराज मंदिर ते मंगवडे वस्ती रस्त्यासाठी ७ लाख

रुपये निधी मंजूर झाला आहे. भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही कामांना निधी मंजूर झाला आहे. ह.भ.प. रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तात्या सरडे, बाबासाहेब बोरकर, दादासाहेब भोसले, शंकर सरडे, आबासाहेब नलवडे, भारत राखुंडे, महादेव नलवडे, सतिश राखुंडे, उत्तम धनवे, पोपट मगंवडे, काकासाहेब बोरकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
