कमलाई नगरी

अनाथांच्या सोबत गाण्याच्या मैफिली मध्ये रंगाची उधळन करित आगळे वेगळे धुलिवंदन साजरे केले. धायरी,  जनाआधार नसलेल्या अनाथांना मानवतेची सेवा म्हणुन अनाथांच्या सोबत गाण्याच्या मैफिली मध्ये रंगाची उधळन करित एक आगळे

वेगळे धुलिवंदन आसरा अनाथाश्रमात साजरे करण्यात आले. हा मानवतावादी जिव्हाळ्याचा सामाजिक उपक्रम सिंहगडरोड परिसरातील स्वच्छंदी मैत्री कट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी  स्वच्छंदी मैत्री कट्टा बाळकृष्ण नेहरकर, अनिल डांगे, शोभा बल्लाळ, अपर्णा काळे, सुरेखा वाबळे, सोनाली येनपुरे यांचा समावेश होता. इत्यादींनी सुरेल

गाण्यांची मैफिल सादर केली. तसेच साखर, तेल, साबण,बेसन पीठ इत्यादी अनेक जीवनावश्यक वस्तु देण्यात आल्या. यावेळी गाण्याच्या तालावर आजीआजोबांसोबत येथील चिमुकल्या मुलांनीही ठेका धरला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *