भिगवण, ता. दौंड : प्रतिनिधी

स्वामी-चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्था संचलित, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी व दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचा दोन दिवसांच्या शैक्षणिक, संशोधनपर व ज्ञानवर्धक सत्रांनंतर उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखदार समारोप झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने करण्यात आली होती. परिषदेसाठी अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी विद्यार्थ्यांना संशोधन व नवोन्मेषासाठी प्रेरित केले, तर सचिव माया झोळ यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

सदर परिषदेमध्ये मलेशिया येथील तज्ज्ञ डॉ. सॅम चान सिओकी यांनी “औषधशास्त्रातील नाविन्यपूर्ण नॅनो-आधारित इलेक्ट्रोस्पिनिंग” या विषयावर मार्गदर्शन केले, तर डॉ. एनजी क्वोक वेन यांनी “एमएलएच१-कमतरतेच्या कॅन्सरसाठी सिंथेटिक लेथल थेरपीटिक्स” या विषयावर सखोल विवेचन केले. तसेच फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया चे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर प्रा. (डॉ.) अतुलकुमार नासा यांनी फार्मसी शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर व भविष्यातील संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या परिषदेत देशातील विविध राज्यांतील महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. गोवा, आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश येथून ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर सादरीकरणात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवसाचा समारोप सांस्कृतिक नृत्य कार्यक्रमाने करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी डॉ. विजय कोत्रा यांनी “ड्रग डिस्कव्हरी” तर डॉ. व्यंकटेश्वर राव यांनी “इंडस्ट्री व गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (GMP)” या विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित केले. परिषदेदरम्यान पोस्टर व ओरल प्रेझेंटेशन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

पोस्टर प्रेझेंटेशन (M.Pharm / Ph.D.)

प्रथम – हेमरात मेश्राम, Poona College of Pharmacy

द्वितीय – सुकन्या राणे, Goa College of Pharmacy

तृतीय – अमृता दुधाळ, Delonix College of Pharmacy

पोस्टर प्रेझेंटेशन (B.Pharm / D.Pharm)

प्रथम – प्रतीक्षा गवळी व शीतल इवले, SVPM’s College of Pharmacy

द्वितीय – अर्जुन गोरे, Vidya Niketan College of Pharmacy

तृतीय – ओंकार ढोक व दीपक काटे, Delonix College of Pharmacy

ओरल प्रेझेंटेशन

M.Pharm – प्रथम : ऋषिकेश चौधरी, Channabasweshwar Pharmacy College

B.Pharm / D.Pharm –

प्रथम : समृद्धी सुरवसे व सृष्टी झडे, SVPM’s College of Pharmacy

द्वितीय : रोहन काडगी व प्रणव ध्यावरकोंडा, Lokmangal College of Pharmacy

तृतीय : स्वप्नाली घाडगे व प्राजक्ता शिंदे, SVPM’s College of Pharmacy

विजेत्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आखून परिषद यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. स्नेहल दुरंदे यांनी प्रभावीपणे केले. प्राचार्या डॉ. ज्योती जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक काम करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला. परिषदेचे कॉन्व्हेनर डॉ. श्रीकांत कुमार तसेच को-ऑर्डिनेटर डॉ. हरिबा जेडगे व प्रा. अमित पोंदकुले यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.

दोन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, नव्या तंत्रज्ञानाची जाण आणि करिअरच्या नव्या संधींबाबत सकारात्मक दृष्टी निर्माण केली. एकूणच, दत्तकलामध्ये पार पडलेली ही परिषद शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध व संस्मरणीय ठरली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *