
वीट ग्रामस्थांनी काढली विजयी संघाची डॉल्बी सह मिरवणूक,
दिनांक 10 जानेवारी 2023 वार मंगळवार या दिवशी झालेल्या जिल्हास्तरीय लहान गट खो खो स्पर्धेमध्ये मुलीने चित्त थरारक असा विजय मिळवून करमाळा तालुक्यासह वीट गावाचे नाव जिल्ह्यामध्ये झळकावीले, त्यामुळे गावातील सर्व तरुण वर्ग वीट ग्रामपंचायत ,शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी या विजयी संघाची मिरवणूक जोरदार करण्याचे नियोजन केले आणि त्या नियोजनानुसार दिनांक 14/ 1 /2023 वार शनिवार या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता या विजयी संघाचे डॉल्बी सह जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली, मिरवणूकी दरम्यान ठिकठिकाणी अनेक महिलांनी या विजयी संघाचे औक्षण केले . डॉल्बीच्या तालावर छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी जिल्हा परिषद केंद्र शाळा वीटचे सर्व विद्यार्थी गावातील सर्व तरुण वर्ग यांनी सहभागी होऊन मनमुराद आनंद लुटला . गावातून मिरवणूकी दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या जल्लोषात हि मिरवणूक अनेक ठिकाणी फुलांच्या वर्षावासह जिल्हा परिषद केंद्र शाळा वीट या ठिकाणी पोहोचली .

या कार्यक्रमासाठी करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय कोळेकर सर,सरपंच उदय ढेरे ,जिल्हा परिषद सदस्य बिभिषण आवटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकूश जगदाळे वीट ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सरपंच व सदस्य तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब ढेरे सर्व शिक्षक वृंद वीट मधील सुजाण नागरिक तसेच तरुण वर्ग या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
सुरुवातीला सर्व विजयी संघातील विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज राऊत साहेब यांनी ट्रॉफी व खो-खो चे प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला, तसेच यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन सन्मानीत करण्यात आले तसेच या संघाला जिल्हा स्पर्धेपर्यंत पोचविण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाचे श्री जगन्नाथ जाधव सर

श्री गोरख ढेरे सर श्री बरडे सर श्री विनोद ढेरे सर पोदवडी शाळेचे शिक्षक श्री भाऊसाहेब गायकवाड सर व केंद्रप्रमुख श्री चोरमले सर यांनी खूप खूप परिश्रम घेतले व अनमोलअसे मार्गदर्शन केले सर्वांच्या सहकार्यामुळेच लहान गट जिल्ह्यामध्ये विजय होऊ शकला. या सर्व मार्गदर्शक शिक्षकांना फेटे बांधून त्यांचाही सत्कार ग्रामस्थांच्य वतीने करण्यात आला . या कार्यक्रमाचे
प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अर्जुन ढेरे सर यांनी केले यावेळी श्री म्हैत्रे सर मनोज ढेरे तेजस ढेरे मार्गदर्शक शिक्षकांच्या वतीने श्री जगन्नाथ जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत आणि गणेश भाऊंनी या विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले. व येत्या 26 जानेवारीला या सर्व मार्गदर्शक शिक्षकांचां यस कल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे येथोचित्त सन्मान केला जाईल असे जाहीर केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन श्री एच यु जाधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री गोरख ढेरे सर यांनी केले.
