
करमाळा प्रतिनिधी
शोभा आडगळे मॅडमची आदर्श सेवा असे विचार शोभा आडगळे मॅडमच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त महात्मा गांधी विद्यालय, काटेगाव, ता. बार्शी व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी पुणे शिक्षक विभाग आमदार जयंत आसगावकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केले.
त्यांनी आपले विचार व्यक्त करताना पुढे म्हटले की, आडगळे मॅडमच्या सेवेचा आदर्श घ्यावा. त्यांनी अनेक वर्ष सेवा करुन अनेक विद्यार्थी घडविले. शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी देशसेवा केली. त्यांचे अनेक विद्यार्थी वेगवेगळया पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मौलीक मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुढे नेहली.

याचवेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, शोभा आडगळे (शिक्षिका) यांचा निकाल नेहमीच चांगला होता. संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. त्यांच्या पुढील आयुष्यास शुभेच्छा. याचवेळी त्यांचे पती प्रा. वसंतराव यादव यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या सेवापूर्ती कार्यक्रमास माजी प्राचार्य चंद्रकांत मोरे, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक सी.एस. मोरे सर, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.वाय. पाटील सर यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी विष्णू पाटील सर, भालके सर, उपस्थित होते.

या कार्याक्रमास महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षिका, शिक्षक, प्राध्यापक, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सेवक, माजी विद्यार्थी, गावातील मान्यवर ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समितीतील सदस्य व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्योने उपस्थित होते.