एसटी महामंडळ खेळते आहे प्रवाशांच्या जीवाशी
(करमाळा ) एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संप काळात नादुरुस्त झालेल्या व जुन्या बसेस यांची तात्पुरती दुरुस्ती करून बऱ्याचशा आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावरती या बसेस वापरल्या जातात त्यामुळे मागील वर्षापासून एसटी महामंडळाच्या अपघातामध्ये सातत्याने वाढ होत आहे, याचेच उदाहरण आज दि ,१७ ला सकाळी मुरुड जवळ लातूर- पुणे एसटी बसला झालेला भीषण अपघात 36 प्रवासी घेऊन जाणाऱ्या या बसची स्टेरिंग निखळल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कठवड्याला जोरदार धडकली या बस मधील ड्रायव्हर कंडक्टरसह काही प्रवाशांना गंभीर दुखापत झालेलि असुन, काही प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत , दिवसेंदिवस सातत्याने एसटीचे अपघात घडत आहेत यामध्ये अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तसेच अनेक प्रवाशांना कायमचे अपंगत्व पण आलेले आहे , संप काळात एसटी वाहतूक संपूर्ण वर्षभर बंद होती, यामुळे जाग्यावरती उभा असलेल्या बस गाड्यांचा अतोनात नुकसान झाले कारण वर्षभर बसेस् ची दक्षता न घेतल्यामुळे बसेसचे टायर, स्पेअर पार्ट खराब होऊन गाड्यांमध्ये मोठे बिघाड झालेले आहेत ,परंतु असे असताना देखील एसटी

डेपो मध्ये या गाड्या तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून तशाच चालक वाहकाच्या हातात या बसेस सोपवल्या जातात चालक वाहकांनाही दैनंदिन ड्युटी मिळत नसल्यामुळे दिवस वायला जाऊ नये ,यासाठी ते नादुरुस्त असणारे बसेस घेऊन मार्गस्थ होतात आणि यामुळेच अनेक ठिकाणी दैनंदिन एसटीचे अपघात घडत आहेत, एकीकडे प्रवासी आमचे दैवत असे ब्रीद वाक्य सर्व बसेस वरती लिहिण्यात आलेले असते परंतु ,प्रत्यक्षात एसटी महामंडळ अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे, गेल्या वर्षभरामध्ये दैनंदिन एसटी बसेस चे हे कोठे ना कुठे अपघात होत आहेत मागील महिन्यामध्येच करमाळा आगाराची सकाळी सहा वाजता सुटणारी करमाळा- पुणे ही बस पुण्याच्या दिशेने जात असताना भिगवन च्या पुलावर्ती ड्रायव्हर साईडच्या चाकाची पिन तुटली , बसचे चाक जागेवरती अडकल्यामुळे स्टेरिंग जाम झाले होते ,परंतु ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे व् गाडीचा वेग कमी असल्यामुळे ही बस वेळीच रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात आली यामुळे बसमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले या सर्व घटनांना जबाबदार कोण हा प्रश्न आज प्रत्येक एसटी प्रवाशाला पडलेला आहे कारण एसटीचे चालक वाहक हे सरळ सांगतात की आम्ही याला जबाबदार नाही आम्हाला अशाच नादुरुस्त बसेस डेपो मधून दिल्या जातात त्यामुळे आम्हालाही आमचा जीव धोक्यात घालून ड्युटी कराव्या लागतात, नादुरुस्त झालेल्या बसेस मार्गावरती सोडण्यात येऊ नये अशी प्रवासी संघटनांकडून मागणी करण्यात येत आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *