पांडे ग्रामपंचायत येथे विविध विकास कामे मंजूर – उपसरपंच नितीन निकम यांची माहिती

करमाळा – पांडे ग्रामपंचायत येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी  12177000/- रुपये

निधी मंजूर झाला आहे, तसेच माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निधीतून स्मशानभूमीला  300000/- रुपये

 निधी व गावामध्ये पाच स्ट्रीट लाईट भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या माध्यमातून गावासाठी मिळाल्याची

माहिती पांडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन निकम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली,

पुढे बोलताना निकम म्हणाले की भाजपा अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये केंद्र सरकार , राज्य सरकार व डिपीडिसीच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मंजूर करु व सर्वसामान्यांपर्यंत योजना राबवून गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील मत व्यक्त केले ,

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *