करमाळा प्रतिनिधी

संगोबा ते वाघाची वाडी बोरगाव ते पाडळी रस्त्याचे आठ दिवसांमध्ये काम चालू न झाल्यास बोरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला. देशाचे मा. पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये प्रधानमंत्री सडक योजने मधून संगोबा ते वाघाची वाडी हा रस्ता झाला होता. बोरगाव घारगाव पाडळी हा रस्ता ही त्याच दरम्यान झाला होता. काटे वाडी ता. परांडा येथे खडी क्रेशर असल्यामुळे पाच ते सहा ब्रास खडी घेऊन टिपर वाहतूक करत आहेत त्यामुळे संपूर्ण रस्ता उघडलेला आहे. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहे हेच कळत नाही.

करमाळा ते मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता आहे. मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक केली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या धुळीने अनेक ग्रामस्थांना आजार होऊ लागले आहेत. प्रशासनाने जर आठ दिवसांमध्ये या रस्त्याचे काम चालू न केल्यास बोरगाव, वाघाचीवाडी, दिलमेश्वर, पाचवड, काठेवाडी, तांदळवाडी, घारगाव, पाडळी, कोकरवाडी या ग्रामस्थांना बरोबर घेऊन रास्ता रोको बोरगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे असा इशारा सुपनवर यांनी दिला.

यावेळी बोरगावचे सरपंच विनय ननवरे, बाळासाहेब वाघ, देविदास वाघ, गजानन महाराज, सुनील भोगले, आदेश भोगल, समाधान देशमुख, संजय गायकवाड, संभाजी डवले, काका भोगल, पप्पू मस्के, राजेंद्र भोज, राजेंद्र वाळुंजकर, आदेश भोगल, अण्णासाहेब केसकर, किरण केसकर, प्रवीण होगले, जीवन होगले, रमेश होगले, आदिजण ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *