
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद / पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम प्रसिद्ध झालेनंतर करमाळ्यातल्या राजकारणाला चांगलाच रंग भरला आहे. त्यातच या निवडणुकी करिता बागल गट व माजी आ. संजयमामा शिंदे या दोन्ही गटांचे झालेले मनोमिलन, प्रत्येक गट/गणात दिलेले तगडे व जनतेतील सक्षम उमेदवार या जमेच्या बाजु आहेत. याशिवाय विद्यमान आमदार नारायण पाटील व सवितादेवी राजेभोसले (मोहिते पाटील गट) यांचेत झालेली फाटाफुट पाहता, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी

निवडणुकी पासुन अलिप्त राहात योग्य उमेदवारांना साथ देण्याचे केलेले आव्हान व दिलेला आशिर्वाद यामुळे कोर्टी जिल्हा परिषद गटात रंगत निर्माण झाली आहे. कोर्टी जिल्हा परिषद गटातुन माजी आमदार संजयमामा शिंदे (राष्ट्रवादी) व रश्मी दिदी बागल, दिग्विजय बागल (भाजपा) यांचे युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार वनिताताई सुभाष गुळवे यांना उमेदवारी असुन त्यांचे पती सुभाष आबा गुळवे हे पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय असुन बारामती ॲग्रोचे व्हा. चेअरमन आहेत. त्यांनी भागातील हजारो तरुणांचे हाताला रोजगार उद्योगधंद्यासाठी कारखान्याच्या माध्यमातुन कायमच मदत केलेली आहे. त्यांचे

कार्यकर्त्यांचे जाळे व यंत्रणा मोठी असुन नियोजन बध्द प्रचार चालु आहे. कोर्टी पंचायत समिती गणातुन नाना झाकणे या कोर्टी परिसरातील तळागाळातील युवकाला बागल गटाने उमेदवारी दिलेली असुन, नाना झाकणे यांचा दुग्ध व्यवसायाचे निमित्ताने व सोबत असणारे मित्र परिवाराचे पाठबळाने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. याशिवाय केत्तुर पंचायत समिती गणातुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी देखिल सर्वसामान्यांची ताकद असलेला व कायम लोकसंपर्कात राहुन विविध प्रश्नाची जाण असणारे उच्चशिक्षित, अभ्यासु नेतृत्व ॲड.अजित विघ्ने यांना उमेदवारी दिलेली आहे. ॲड. अजित विघ्ने यांचा रोजचा जनसंपर्क, विविध भुषविलेली पदे, संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणुन केलेले प्रभावी काम, उत्कृष्ट वक्तृत्व शैली, त्यांचा करमाळ्यात असणारा रोजचा संपर्क व मित्र मंडळींचे पाठबळ या सर्व जमेच्या बाजु असुन कोर्टी जिल्हा परिषद गटातुन हे तिन्ही उमेदवार निवडून येतील याची खात्री मतदारांमधुन व्यक्त होताना दिसत आहे.