करमाळा प्रतिनिधी

धनगर समाजाच्या हितासाठी सर्वांगीण विकासासाठी लढणारा लढवय्या नेतृत्व दिपक भाऊ बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी मध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्यात यावे ही मागणी केली आहे. ही मागणी वास्तव व रास्त आहे. वास्तविक पाहता धनगर समाज हा एसटी मध्ये समाविष्ट आहे परंतु नजर चुकीने धनगरच्या ऐवजी धनगड असे झाले आहे आणि त्यामुळे

धनगर समाज हा एसटी आरक्षणाचा खरा लाभार्थी असताना देखील त्यांना त्या पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. लाभ मिळत नाही धनगर आणि धनगड ही जात एकच आहे. ज्या पद्धतीने गुरगावचे – गुडगाव, जाखरीचे – जाकारी, ताकारीचे-ताकाडि झाले आहे तसेंच काही धनगर चे धनगड झाले आहे. भाषा शास्त्राचा निकष लावून धनगड ऐवजी धनगर असा उल्लेख करण्यात यावा व धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी

देखील अनेक वेळा आंदोलने केली आहेत. एसटी आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात नाही परंतु राज्य सरकारने धनगड ऐवजी धनगर असं वाचण्यात यावे हा अध्यादेश काढून केंद्राकडे तशी शिफारस करण्यात यावी व केंद्र सरकाराने त्याची अंमलबजावणी करावी. यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळू शकेल. धनगर समाजाची मागणी योग्य असल्याने आपण देखील या लढ्यात सामील होणार आसल्याचे माहिती हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *