
करमाळा प्रतिनिधी
जि. प. व पंचायत समिती निवडणूकीपूरता तात्पूरता पॉझ घेतोय, भविष्यात नव्या उमेदीने व ताकदीने जगताप गट उभारी घेईल असे मा. आ. जयवंतराव जगताप यांनी सांगितले.

सध्या गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या राजकारणात निष्ठा, शब्द, तत्वे राहीली नसून भ्रष्टाचार, बंडखोरी, लक्ष्मीदर्शन, बेईमानी अन् ताटली – बाटलीचे राजकारण यांचं उधाण आलय, सोनं आडगळीला पडलं तरी त्याची किंमत कमी होत नसते, आज जरी पितळ चमकल्यासारखं वाटत असलं तरी ते शेवटी पितळच आहे. जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेतच असावं लागतं असं नाही. देशभक्त कै. नामदेवराव जगताप, कै. आण्णासाहेब जगताप यांचे पासून आमच्या रक्तात तत्व, प्रामाणिकपणा, दिलेला शब्द पाळणे या गोष्टी आहेत. मी शिवसेना पक्षातच असून शिवसेना पक्षाचेच काम करणार आहे. परंतू तालुक्यातील सध्याच्या राजकीय गोंधळामूळे मी पक्षातील वरीष्ठांशी चर्चा करून तात्पूरतं या इलेक्शन पूरतं थांबण्याबाबत निर्णय घेत आहे. अनेक माझे कार्यकर्ता म्हणता सर्वकाही ओळखतात जो आपल्या गावाचा, परिसराचा

विकास करील त्याला या निवडणूकीत मत द्या असे मी गटाच्या मतदारांना आवाहन करतो असे प्रतिपादन आयोजित पत्रकार परिषदेत मा.आ. जयवंतराव जगताप यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना केले. जगताप गटाला ७० वर्षाची परंपरा आहे. कार्यकर्त्यांनी नाऊमेद न होता. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन पून्हा आपण उभारी घेवू असा मला आत्मविश्वास आहे असेही ते म्हणाले.