सामाजिक अधिकारता शिबीर
अकलूज: सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय,दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) यांचे माध्यमातुन सामाजिक अधिकारता शिबीर व दिव्यांगजनांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी भारत सरकारच्या एडिप योजने अंतर्गत मोफत सहाय्यक उपकरणांसाठी करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यातील नोंदणी झालेल्या २९३४ दिव्यांग व जेष्ठ नागरिकांपैकी आज पहिल्या टप्प्यात माळशिरस तालुक्यातील १५९ दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते व अलिम्कोचे मुंबई रिजनल मॅनेंजर एस.सेनगुप्ता यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, अलिम्कोचे किरण पावरा, शिवतेजसिंह मोहिते पाटील, अकलुज नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पं.स.मा.उपसभापती प्रतापराव पाटील, भाजपा करमाळा तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल , दत्ता टापरे, प्रवीण सोमासे, शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती ट्रस्टचे सर्व संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *